1 Samuel 25:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाबालच्या एका सेवकाने अबीगईलला ही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्यांच्याशी क्षुद्रपणे वागला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे एका चाकराने नाबालाची स्त्री अबीगईल हिला सांगितले की, “दाविदाने रानातून आमच्या स्वामींचे क्षेमकुशल विचारण्यासाठी जासूद पाठवले होते, पण तो त्यांच्या अंगावर ओरडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्याने त्यांचा अपमान केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाबालाची पत्नी अबीगईल हिला चाकरातील एकाने सांगितले, “पाहा दावीदाने रानातून आमच्या धन्याला सलाम सांगायला दूत पाठवले. परंतु तो त्यांच्या अंगावर धावून गेला.