1 Samuel 25:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंढरांबरोबर आम्ही उघड्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमची कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे लोक आमच्याशी चांगल्या रीतीने वागले आणि आम्ही मैदानात होतो तोवर त्यांचे-आमचे दळणवळण होते; त्या वेळी त्यांनी आम्हांला काही उपद्रव केला नाही व आमची काही हानी झाली नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती माणसे तर आम्हाशी फार चांगली वागली; त्यांनी आम्हास काही उपद्रव केला नाही; जितके दिवस आम्ही रानात त्यांच्याबरोबर राहिलो तितके दिवस आमची काही हानी झाली नाही.