1 Samuel 25:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मावोनात एक पुरुष होता त्याची मालमत्ता कार्मेल येथे होती; तो पुरुष फार मोठा होता; त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकरी होती; तो आपली मेंढरे कर्मेलात कातरीत होता.