1 Samuel 25:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
निर्दोष लोकांची हत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर आता माझ्या प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तुझा जीव जिवंत आहे. रक्त पाडण्याच्या दोषापासून आणि आपल्या हाताने सूड घेण्यापासून परमेश्वराने तुम्हास आवरले आहे. तर आता जे तुमचे शत्रू व जे माझ्या प्रभूचे वाईट करायला पाहतात ते नाबालासारखे होवोत.