1 Samuel 25:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदचा निरोप नाबालला सांगितला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाच्या तरुण पुरुषांनी जाऊन त्याच्या नावाने नाबालाला हे सर्व शब्द सांगितले व ते स्तब्ध राहिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला विनंती करतो जे काही तुझ्या हाताशी येईल ते तू तुझ्या दासांना व तुझा मुलगा दावीद याला दे. मग दावीदाचे तरुण येऊन या सर्व शब्दांप्रमाणे दावीदाच्या नावाने नाबालाशी बोलून शांत राहिले.