1 Samuel 26:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने तेथून सैन्याला आणि अबनेरला हाका मारल्या. “अबनेर, ओ दे” असा पुकारा केला. अबनेर म्हणाला, “तू कोण आहेस? राजाला हाका मारणारा तू कोण?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद त्या लोकांना आणि नेराचा पुत्र अबनेर ह्यांना मोठ्याने हाक मारून म्हणाला, “अबनेरा, ओ का देत नाहीस?” तेव्हा अबनेराने म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दावीदाने लोकांस व नेराचा मुलगा अबनेर याला हाक मारली. तो म्हणाला, “अबनेरा तू उत्तर करीत नाहीस काय?” तेव्हा अबनेराने उत्तर देऊन म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”