1 Samuel 26:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद हित्ती, अहीमलेख, आणि सरुवेचा मुलगा अहीशय यांच्याशी बोलला. (अबीशय हा यवाबचा भाऊ). या दोघांना दावीदाने विचारले, “माझ्याबरोबर शौलच्या तळावर यायला कोण तयार आहे” अबीशय म्हणाला, “मी येतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा अहीमलेख हित्ती व सरूवेचा मुलगा अबीशय यवाबाचा भाऊ यांना दावीदाने उत्तर देऊन म्हटले, “छावणीत शौलाकडे खाली माझ्याबरोबर कोण येईल?” तेव्हा अबीशय म्हणाला, “मी तुझ्याबरोबर खाली येईन.”