1 Samuel 27:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने आखीशचा विश्वास संपादन केला. आखीश मनात म्हणाला, “इस्राएलचे लोक आता दावीदचा द्वेष करतात. त्याच्याशी त्यांचा उभा दावा आहे. तेव्हा दावीद आता चिरकाल माझीच सेवा करील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आखीशाने दावीदावर भरवसा ठेवून म्हटले, “त्याने आपल्या इस्राएली लोकांकडून आपणाला अगदी तुच्छ मानवून घेतले आहे, म्हणून तो सर्वकाळ माझा दास होऊन राहील.”