1 Samuel 27:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद आखीशला म्हणाला, “माझ्यावर तुझी मेहेरनजर असेल तर या मुलखातील एखाद्या ठिकाणी मला राहायला जागा दे. मी केवळ एक सेवक आहे. मी असेच कुठेतरी राहायला पाहिजे, तुझ्याबरोबर इथे राजधानीच्या शहरी नव्हे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद आखीशास म्हणाला, “माझ्यावर आपली कृपादृष्टी असेल तर एखाद्या खेडेगावात मला जागा द्या म्हणजे मी तेथे राहीन; आपल्या दासाने आपल्याबरोबर राजधानीत का राहावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, “जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद आखीशाला म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर या मुलखातील कोणाएका नगरात मी तेथे रहावे म्हणून मला जागा दे; तुझ्या दासाने राजधानीत तुझ्याजवळ का रहावे?”