1 Samuel 28:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौलने विचारले, “तो दिसायला कोणासारखा आहे?” ती म्हणाली, “एक विशिष्ट प्रकारचा अंगरखा घातलेला एक वृध्द आहे.” तो शमुवेलच असल्याचे शौलाच्या लक्षात आले. जमिनीपर्यंत वाकून त्याने त्याला अभिवादन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने तिला विचारले, “त्याचे स्वरूप कसे आहे?” ती म्हणाली, “एक वृद्ध पुरुष उठून येत आहे; त्याने झगा घातला आहे.” तेव्हा शौलाने ताडले की तो शमुवेल असावा; म्हणून त्याने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तो कसा दिसतो?” त्याने विचारले. “झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली. तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो तिला म्हणाला, “तो कोणत्या रूपाचा आहे?” तिने म्हटले, “म्हातारा मनुष्य झगा घातलेला असा आहे.” तेव्हा तो शमुवेल आहे असे शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला.