1 Samuel 28:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने माझ्या द्वारे जे जे सांगितले होते तेच तो आता करत आहे. तुझ्या हातातून राज्य खेचून घेऊन ते तो तुझ्या लगतच्या दुसऱ्यांच्या हाती सोपवत आहे हा शेजारी म्हणजे दावीद.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने माझ्या द्वारे मोशेला सांगितले होते तसेच त्याने आपल्या मनोदयाप्रमाणे केले आहे; परमेश्वराने तुझ्या हातून राज्य हिसकावून घेऊन तुझा शेजारी दावीद ह्याला दिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे परमेश्वराने माझ्याकडून तुला सांगितले तसे त्याने तुझे केले आहे. परमेश्वराने तुझ्या हातातून राज्य काढून घेतले आहे, आणि तुझा शेजारी दावीद याला ते दिले आहे.