1 Samuel 28:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ती बाई शौलजवळ आली. तो घाबरल्याचे तिने पाहिले आणि त्याला ती म्हणाली, “पाहा, मी तुझ्या सेवेत आहे. तुझे म्हणणे मी ऐकले आहे. मला जे करायला सांगितले ते मी जीव धोक्यात घालून केले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती स्त्री शौलाकडे आली व तो फार व्याकूळ झाला आहे असे पाहून त्याला म्हणाली, “पाहा, आपल्या दासीने आपले म्हणणे ऐकले, आणि आपला प्राण मुठीत धरून आपण मला सांगितलेले शब्द मी ऐकले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या स्त्रीने शौलाकडे येऊन तो फार घाबरला आहे असे पाहून त्यास म्हटले, “पाहा तुमच्या दासीने तुमची वाणी ऐकली आहे. आणि मी आपला जीव आपल्या मुठीत धरून तुम्ही माझ्याशी जे शब्द बोलला ते ऐकले आहेत.