1 Samuel 28:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शेवटी शौल आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला, एखाद्या भूतविद्याप्रवीण बाईला गाठा. तिलाच या युध्दाविषयी प्रश्न विचारतो. ते अधिकारी म्हणाले, “अशी एक बाई एन-दोन येथे आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एखादी भूतविद्याप्रवीण स्त्री शोधा म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्‍न विचारीन.” त्याचे चाकर त्याला म्हणाले, “पाहा, एन-दोर येथे एक भूतविद्याप्रवीण स्त्री राहत आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक स्वामिनी शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाईन आणि तिला विचारेन.” ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल आपल्या चाकरांना म्हणाला, भूत जिच्या परिचयाचे आहे अशा एखाद्या स्त्रीचा माझ्यासाठी शोध करा, “म्हणजे मी तिच्याकडे जाऊन तिच्याजवळ विचारीन.” तेव्हा त्याच्या चाकरांनी त्यास म्हटले, “पाहा भूत जिच्या परिचयाचे आहे अशी एक स्त्री एन-दोर येथे आहे.”