1 Samuel 28:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ती बाई शौलला म्हणाली, “शौलने काय केले माहीत आहेना? त्याने सर्व भूताविद्याप्रवीण आणि भविष्यवादी लोकांना इस्राएलमधून हद्दपार केले आहे. मलाही त्यात अडकवून मारायचा तुझा विचार दिसतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती स्त्री त्याला म्हणाली, “शौलाने काय केले ते तुला ठाऊकच आहे; भूतविद्याप्रवीण व चेटकी ह्यांचे त्याने देशातून उच्चाटन केले आहे; आता मला मारून टाकावे म्हणून माझ्या जिवाला पाश का लावतोस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, “पाहा शौलाने काय केले आहे, त्याने भूते ज्यांच्या परिचयाची आहेत अशा जाणत्यांना व जादूगिरांना देशातून कसे काढून टाकले आहे, हे तू जाणतोस तर मी मरावे असे करण्यासाठी तू कशाला माझ्या जिवाला पाश घालतोस?”