1 Samuel 29:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आखीशने त्याला सांगितले, “मला तू आवडतोस. तू देवाने पाठवलेल्या दूतासारखाच आहेस. पण दावीदाने आमच्या बरोबर युध्दावर येऊ नये असे पलिष्टी सरदारांचे म्हणणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आखीशाने दावीदाला उत्तर देऊन म्हटले, “तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा चांगला आहेस असे मी जाणतो. परंतु याने आमच्याबरोबर लढाईला येऊ नये असे पलिष्ट्यांचे सरदार म्हणाले आहेत.