1 Samuel 3:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लहानगा शमुवेल एलीच्या हाताखाली परमेश्वराच्या सेवेत मगन्न होता. त्या काळी परमेश्वराने लोकांशी प्रत्यक्ष बोलण्याचे प्रसंग फार क्वचित येत असत. तो सहसा दृष्टांत देत नसे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेल बाळ एलीसमक्ष परमेश्वराची सेवा करत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते; त्याचे दृष्टान्त वारंवार होत नसत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली याहवेहची सेवा करीत होता. त्या दिवसात याहवेहचे वचन दुर्मिळ होते; दृष्टान्तही फारसे मिळत नसत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमुवेल बाळ एलीच्या हाताखाली देवाची सेवा करीत होता. परमेश्वराचे वचन त्या दिवसात दुर्मिळ झाले होते; वारंवार भविष्यसूचक दृष्टांत होत नव्हते.