1 Samuel 3:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एली आपल्याला बोलवत आहे असे वाटल्याने तो लगबगीने एलीजवळ गेला. त्याला म्हणाला, “मला बोलावलत ना? हा मी आलो.” पण एली म्हणाला, “मी नाही हाक मारली जा, जाऊन झोप.” शमुवेल झोपायला गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारलीत?” तो म्हणाला, “मी हाक मारली नाही; परत जाऊन नीज.” त्यावरून तो परत जाऊन निजला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि तो धावत एलीकडे गेला आणि म्हणाला, “मी येथे आहे; तुम्ही मला बोलाविले.” परंतु एली म्हणाला, “मी बोलाविले नाही; परत जा आणि झोप.” तेव्हा तो गेला आणि झोपला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेल एलीकडे धावत जाऊन म्हणाला, “मी येथे आहे, कारण तुम्ही मला हाक मारलीत.” आणि एलीने म्हटले, “मी बोलावले नाही परत जाऊन झोप.” म्हणून शमुवेल परत जाऊन झोपला.