1 Samuel 30:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दावीद आणि त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलाग येथे आली. अमालेक्यांनी सिकलाग आणि नेगेव भागावर हल्ला चढवून सिकलाग शहर भस्मसात केलेले त्यांनी पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद आपल्या माणसांबरोबर सिकलाग येथे तिसर्या दिवशी पोहचला तेव्हा त्यांच्या दृष्टीस पडले की अमालेक्यांनी दक्षिण देश व सिकलाग ह्यांवर स्वारी केली असून सिकलागवर मारा करून ते अग्नीने जाळून टाकले आहे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिसर्या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते.