1 Samuel 30:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या मिसरी माणसाने दावीदला अमालेक्यांच्या तळापर्यंत नेले. तेथे ते लोक खात पित आणि मौजमजा करत इतस्तत: पसरले होते. पलिष्टी आणि यहूदा प्रांतातून आणलेल्या लुटीचा ते मनसोक्त उपभोग घेत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याला तेथे घेऊन गेला तेव्हा त्याला असे दिसले की लोक जमिनीवर चोहोकडे पांगून खाऊनपिऊन मजा करीत आहेत; कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या प्रांतातून व यहूद्यांच्या प्रांतातून पुष्कळ लूट आणली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्याने दावीदाला तिथे नेले, तेव्हा पाहा, ते त्या भागात सर्वत्र पसरले होते. खात, पीत व मौजमजा करीत होते, कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या व यहूदीयाच्या देशातून मोठी लूट आणली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती.