1 Samuel 30:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे दमले भागलेले लोक दावीद बरोबर पुढे जाऊ शकले नाहीत आणि बसोर नदीपाशीच थांबले होते तेथे, त्या दोनशे जणांकडे दावीद आला. दावीद आणि त्याचे सैन्य येताना पाहून ते त्यांना सामोरे आले. त्यांनी दावीदाच्या सैन्याचे आगत स्वागत केले. दावीदाने त्यांचे क्षेम कुशल विचारले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग जे दोनशे पुरुष फार थकल्यामुळे दाविदाबरोबर गेले नव्हते व ज्यांना बसोर नाल्याजवळ तो ठेवून गेला होता, त्यांच्याजवळ दावीद गेला. तेव्हा ते त्याला व त्याच्याबरोबरच्या लोकांना भेटायला सामोरे आले; आणि दाविदाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे क्षेमकुशल विचारले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर जी दोनशे माणसे अतिशय थकल्यामुळे त्याच्याबरोबर जाऊ शकली नव्हती, आणि जे बेसोर खोर्‍याजवळ राहिले होते, त्यांच्याजळ दावीद आला. आणि ते दावीदाला व त्याच्याबरोबर असलेल्या माणसांना भेटायला बाहेर आले. दावीद व त्याची माणसे जवळ जाताच दावीदाने त्यांना अभिवादन केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले.