1 Samuel 30:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद बरोबर गेलेल्यांमध्ये काही विघन्नसंतोषी माणसे होती. ती म्हणाली, “ही दोनशे माणसे आपल्या बरोबर पुढे आली नाहीत. तेव्हा त्यांना आपल्या लुटीतील हिस्सा मिळाणार नाही. त्यांची बायका मुले तेवढी ज्याची त्याने घ्यावीत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दावीदाचे काही दुष्ट व त्रासदायक अनुयायी म्हणाले, “हे लोक आपल्याबरोबर आले नाही, म्हणून आपण सोडवून आणलेल्या लुटीतील वाटा त्यांना आम्ही देणार नाही. तथापि, त्यांनी त्यांच्या स्त्रिया व लेकरे घेऊन निघून जावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.”