1 Samuel 30:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे सिकलाग येथे येऊन पोचतात तो त्यांना शहर जळत असलेले दिसले. त्यांच्या बायका मुलेबाळे यांना नेण्यात आले होते. अमालेक्यांनी सर्वांना उचलून नेले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद व त्याचे लोक नगरात आले तेव्हा नगर जाळून टाकले आहे आणि त्यांच्या स्त्रिया, पुत्र व कन्या पाडाव करून नेल्या आहेत असे त्यांना दिसून आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले.