1 Samuel 30:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीदाने मग परमेश्वराला विचारले, “आमच्या कुटुंबियांना धरुन नेणाऱ्या शत्रूंचा पाठलाग करु का? शत्रू आमच्या तावडीत सापडेल का?” यावर परमेश्वराने सांगितले, “अवश्य त्यांच्या पाठलागावर जाऊन त्यांना पकड. आपल्या घरच्यांची तू सोडवाणूक करशील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने परमेश्वराला प्रश्‍न केला, “मी ह्या टोळीचा पाठलाग करू काय? मी त्यांना गाठीन काय?” त्याने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, तू खात्रीने त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून आणशील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.”