1 Samuel 31:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा तेथील सैनिक रातोरात तेथून निघून बेथ-शान येथे पोचले. तेथे गावकुसावर टांगलेला शौलचा मृतदेह त्यांनी काढला. शौलच्या मुलांची प्रेते ही काढली. याबेश येथे त्यांनी हे सर्व मृतदेह आणले आणि याबेश येथील सर्वांनी त्यांचे दहन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले, आणि रातोरात जाऊन त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते बेथ-शानाच्या गावकुसावरून काढून याबेश येथे आणली व दहन केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांचे सर्व शूरवीर रात्रभर चालून बेथ-शान येथे गेले. त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह बेथ-शानच्या भिंतीवरून खाली उतरविले आणि याबेश येथे आणले व तिथे त्यांनी ते जाळून टाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा सर्व शूर पुरुष उठून रात्रभर चालत गेले आणि त्यांनी शौलाचे प्रेत व त्याच्या मुलांची प्रेते बेथ-शानाच्या भिंतीवरून काढून याबेशाला आणले व तेथे ती जाळली.