1 Samuel 31:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “तुझी तलवार उचल आणि माझ्यावर चालव. नाहीतर हे परकीय मला भोसकून माझी टिंगल टवाळी करतील.” पण त्या शस्त्रवाहकाने भेदरुन या गोष्टीला नकार दिला. तेव्हा शौलने आपली तलवार उपसली व स्वत:ला भोसकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “आपली तलवार उपसून मला भोसक, तसे न केल्यास हे असुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” पण त्याचा शस्त्रवाहक तसे करीना; तो फार घाबरला होता. तेव्हा शौल आपली तलवार काढून तिच्यावर पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शौल आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तू आपली तलवार उपसून तिने मला आरपार भोसक नाही तर हे बेसुंती येऊन मला भोसकून माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक मान्य होईना, कारण तो फार भ्याला. म्हणून शौल आपली तलवार घेऊन तिच्यावर पडला.