1 Samuel 4:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
करारकोशाचे हरण झाले, सासरा व नवरा यांना मृत्यू आला म्हणून तिने मुलाचे नाव ईखाबोद (हरपलेले वैभाव) असे ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या मुलाचे नाव ईखाबोद असे ठेवत ती म्हणाली, “इस्राएलचे वैभव निघून गेले आहे,” कारण परमेश्वराचा कोश हस्तगत करण्यात आला आहे आणि तिच्या सासर्याचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिने मुलाचे नांव ईखाबोद असे ठेवून म्हटले की, “इस्राएलापासून वैभव निघून गेले आहे!” कारण देवाचा कोश पळवून नेलेला होता, आणि तिचा सासरा व तिचा पती हे मरण पावले होते.