1 Samuel 4:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराच्या पवित्र कराराचा कोश छावणीत आणला गेल्याचे त्यांना कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. ते म्हणू लागले, “त्यांच्या तळावर परमेश्वर आला आहे. आता आपले कसे होणार? असे यापूर्वी कधी झालेले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पलिष्टी भयभीत होऊन म्हणाले, “देव छावणीत आला आहे; हायहाय, आता आमचे काय होईल! अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पलिष्टी लोक घाबरून गेले. “देव छावणीत आले आहेत,” ते म्हणाले, “अरेरे! असे अद्याप कधीच घडले नव्हते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा पलिष्टी घाबरले, कारण ते म्हणाले, “परमेश्वर छावणीत आला आहे आम्हास हायहाय! कारण असे कधी पूर्वी घडले नाही.