1 Samuel 5:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशदोदच्या लोकांनी पलिष्ट्यांच्या पाचही अधिकाऱ्यांना एकत्र बोलावून या पवित्र कोशाचे काय करावे याविषयी सल्लामसलत केली. अधिकाऱ्यांनी हा पवित्र कोश गेथ येथे हलवायला सांगितला. त्यानुसार पलिष्ट्यांनी तो पवित्र करारकोश हलवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, “आम्ही इस्राएलाच्या देवाच्या कोशाचे काय करावे?” ते म्हणाले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचता करावा.” तेव्हा त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश गथ येथे मिरवत पोचवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी पलिष्ट्यांच्या सर्व अधिकार्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” त्यांनी उत्तर दिले, “इस्राएलच्या परमेश्वराचा कोश गथकडे घेऊन जा.” तेव्हा त्यांनी इस्राएलच्या परमेश्वराचा कोश तिथून हालविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना आपणाकडे एकवट करून म्हटले, “इस्राएलाच्या परमेश्वराच्या कोशाचे आम्ही काय करावे?” ते बोलले, “इस्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा.” मग त्यांनी इस्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला.