1 Samuel 6:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गाई सरळ बेथशेमेश कडे निघाल्या. त्या हंबरत चालल्या होत्या व मुख्य रस्ता सोडून इकडे तिकडे वळल्या नाहीत. बेथशेमेशच्या हद्दीपर्यंत पलिष्ट्यांचे अधिकारी गाईच्या मागोमाग होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या गाईंनी थेट बेथ-शेमेशचा रस्ता धरला; रस्त्याने त्या हंबरत गेल्या, उजवीडावीकडे वळल्या नाहीत; पलिष्ट्यांचे सरदार त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्या गाई सरळ बेथ-शेमेशच्या रस्त्याने निघाल्या आणि जाताना संपूर्ण रस्त्यावर त्या हंबरत गेल्या; त्या उजवीकडे किंवा डावीकडे वळल्या नाहीत. पलिष्टी लोकांचे पुढारी त्यांच्यामागे बेथ-शेमेशच्या सीमेपर्यंत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या गायी नीट वाट धरून बेथ-शेमेशाच्या रस्त्याने गेल्या; मार्गाने जाताना त्या मोठ्याने हंबरत चालल्या उजवीकडे किंवा डावीकडे फिरल्या नाहीत. आणि पलिष्ट्यांचे अधिकारी बेथ-शेमेशाच्या सीमेपर्यंत त्यांच्यामागे गेले.