1 Samuel 6:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेथशेमेशमधले शेतकरी त्या खोऱ्यात गव्हाची कापणी करत होते. समोर पाहतात तो पवित्र कारारकोश. कोशाचे दर्शन झाल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि ते धावतच जवळ गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रसंगी बेथ-शेमेशचे लोक खोर्यात गव्हाची कापणी करत होते; त्यांनी वर नजर करून पाहिले तेव्हा त्यांच्या दृष्टीस कोश पडला; तो पाहून त्यांना आनंद झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा बेथ-शेमेशाचे शेतकरी खोऱ्यात आपल्या गव्हाची कापणी करीत होते; आणि त्यांनी आपली दृष्टी वर करून कोश पाहिला, तेव्हा तो पाहून ते आनंद पावले.