1 Samuel 6:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशाप्रकारे पलिष्ट्यांनी आपल्या पापक्षालनार्थ परमेश्वराला गळवांच्या पाच सुवर्ण प्रतिमा दिल्या. प्रत्येक पलिष्टी गावातर्फे एक अशा त्या होत्या. अश्दोद, गज्जा, अष्कलोन, गथ, एक्रोन ही ती पाच गावे होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पलिष्ट्यांनी परमेश्वरास दोषार्पण म्हणून ज्या ग्रंथींच्या सुवर्णप्रतिमा पाठवल्या त्या अश्दोदासाठी एक, गज्जासाठी एक, अष्कलोनासाठी एक, गथासाठी एक व एक्रोनासाठी एक अशा होत्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरास पलिष्ट्यांनी ज्या सोन्याच्या गाठी दोषार्पण म्हणून पाठवल्या त्या अशा: अश्दोदकरता एक, गज्जाकरता एक, अष्कलोनाकरता एक, गथकरता एक, एक्रोनाकरता एक.