1 Samuel 6:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सोन्याचे उंदीरही करुन पाठवले. पाच पलिष्टी अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत जेवढी गावे येत होती त्यांच्या संख्येच्या प्रमाणात ते होते. या प्रत्येक गावाभोवती तटबंदी असून सभोवार खेडी होती. बेथशेमेशच्या लोकांनी परमेश्वराचा पवित्र कोश त्या खडकावर ठेवला. यहोशवाच्या शेतात तो खडक अजूनही आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या मोठ्या धोंडेवर परमेश्वराचा कोश उतरला होता तेथवर पलिष्ट्यांच्या पाच सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठवले होते; ती धोंड यहोशवा बेथ-शेमेशकर ह्याच्या शेतात आजपर्यंत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि जो मोठा दगड ज्यावर त्यांनी परमेश्वराचा कोश ठेवला तेथपर्यंत पलिष्ट्यांची जी नगरे, म्हणजे तटबंदीची नगरे व खेडीपाडीही, ज्या पांच सरदांराची होती, त्यांच्या संख्येप्रमाणे ते सोन्याचे उंदीर होते. तो दगड आजपर्यंत यहोशवा बेथ-शेमेशकर यांच्या शेतात आहे.