1 Samuel 6:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथ-शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला; त्याने त्या लोकांतले पन्नास हजार सत्तर पुरुष जिवे मारले; परमेश्वराने माणसांचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग परमेश्वराने काही बेथ-शेमेशकर मनुष्यांना मारले कारण त्यांनी परमेश्वराच्या कोशाच्या आत पाहिले होते. त्याने सत्तर जण मारले. परमेश्वराने लोकांस फार मोठा तडाखा दिला, त्यामुळे लोकांनी शोक केला.