1 Samuel 6:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलिष्ट्यांनी विचारले, “इस्राएलच्या परमेश्वराने क्षमा करावी म्हणून आम्ही कोणत्या भेटी अर्पण कराव्यात?” याजक आणि शकुन पाहणारे यांनी सांगितले, “प्रत्येक नगराचा एक असे तुम्ही पाच पलिष्टी अधिकारी आहात. तुम्ही सर्व सारखेच हैराण झालेले आहात. तेव्हा, गळवांसारख्या दिसणाऱ्या पाच सोन्याच्या प्रतिमा आणि पाच सोन्याचे उंदीर करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणाले, “त्याबरोबर दोषार्पण पाठवायचे ते कोणते?” ते म्हणाले, “पलिष्टी सरदारांच्या संख्येइतक्या ग्रंथींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांना सारखीच पीडा प्राप्त झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलिष्ट्यांनी विचारले, “जे दोषार्पण आम्ही त्यांच्याकडे पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्टी अधिकार्‍यांच्या संख्येप्रमाणे पीडेच्या गाठींच्या पाच व उंदरांच्या पाच सोन्याच्या प्रतिमा; कारण तुम्हाला व तुमच्या अधिकार्‍यांना त्याच पीडांनी पीडले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ते म्हणाले, “जे दोषार्पण त्याबरोबर आम्ही पाठवावे ते काय असावे?” त्यांनी उत्तर दिले, “पलिष्ट्यांचा सरदारांच्या संख्येप्रमाणे पाच सोन्याच्या गाठी व पांच सोन्याचे उंदीर; कारण तुम्हा सर्वांवर व तुमच्या अधिकाऱ्यांवर एकच पीडा आली आहे.