1 Samuel 7:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हा होम चालू असताना पलिष्ट्यांनी इस्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रंचड गडगडाट करुन परमेश्वराने पलिष्ट्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रंचड गर्जनेमुळे घाबरुन ते गोंधळले. सेनापतींचा सैन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इस्राएलींनी त्यांचा पराभव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेल होमार्पण करत असताना पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ येऊन ठेपले; त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यांना घाबरे केले, आणि इस्राएलापुढे त्यांचा मोड झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल होमार्पण करत असताना, पलिष्टी लोक इस्राएली लोकांशी युद्ध करावयाला जवळ आले. तेव्हा याहवेहने प्रचंड गडगडाटाने गर्जना करून पलिष्ट्यांना असे भयभीत केले की, इस्राएली लोकांपुढे त्यांचा बीमोड झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि शमुवेल होमार्पण अर्पण करत होता, तेव्हा पलिष्टी इस्राएलाशी लढायला जवळ आले; परंतु त्यादिवशी परमेश्वराने पलिष्ट्याविरूद्ध मोठ्या आवाजात गडगडाट करून त्यास घाबरे केले व गोंधळात टाकले आणि इस्राएलापुढे त्यांचा पराभव झाला.