1 Samuel 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमुवेलने मिस्पा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. “परमेश्वराने आपल्याला येथवर सहाय्य केले” असे म्हणून त्याने “सहाय्य दगड असे त्याचे नामकरण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शमुवेलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेन ह्यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन-एजर हे नाव देऊन म्हटले की, “येथवर परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शमुवेलाने एक दगड घेतला आणि तो मिस्पाह आणि शेन यांच्यामध्ये उभारला. “येथपर्यंत याहवेहने आमचे साहाय्य केले आहे” असे म्हणत त्याने त्याला एबेन-एजर असे नाव दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेलाने एक दगड घेतला आणि मिस्पा व शेन याच्या दरम्यान तो उभा केला आणि त्यास एबन-एजर असे नाव देऊन म्हटले, “येथपर्यंत परमेश्वराने आमचे साहाय्य केले आहे.”