1 Samuel 7:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे हा कोश किर्याथ यारीम येथे वीस वर्षे होता. इस्राएली लोक पुन्हा परमेश्वराची भक्ती करु लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किर्याथ-यारीम येथे कोश राहिला त्याला बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे निघून गेली; त्यानंतर सर्व इस्राएल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोश किर्याथ-यआरीम येथे पुष्कळ काळ; म्हणजेच वीस वर्षे राहिला. तेव्हा सर्व इस्राएली लोक याहवेहकडे परत फिरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोश किर्याथ-यारीमात येऊन राहिला त्या दिवसापासून, बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे झाली. इस्राएलाच्या सर्व घराण्याने शोक केला आणि परमेश्वराकडे वळण्याची इच्छा केली.