1 Samuel 7:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शमुवेलने एक आख्खे कोकरु परमेश्वराला यज्ञात अर्पण केले. इस्राएलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला ओ दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वराला नि:शेष होम करून इस्राएलासाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शमुवेलाने एक दूधपिते कोकरू घेतले व त्याचा याहवेहला संपूर्ण होमार्पण म्हणून यज्ञ करून, इस्राएलच्या वतीने याहवेहकडे विनंती केली आणि याहवेहने ती ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेलाने एक दूध पिणारे कोकरू घेऊन त्याचे संपूर्ण होमार्पण परमेश्वरास केले; आणि शमुवेलाने इस्राएलासाठी परमेश्वराचा धावा केला आणि तेव्हा परमेश्वराने त्यास उत्तर दिले.