1 Samuel 8:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो म्हणाला, “राजा आपली सत्ता कशी गाजवेल ते ऐका. तुमच्या मुलांना तो तुमच्यापासून हिरावून घेईल. त्यांना बळजबरीने सैन्यात दाखल करील. रथावर, घोड्यांवर स्वार व्हायला लावून तो त्यांना युद्धाला जुंपील. तुमची मुले राजाच्या रथा पुढे रक्षक म्हणून धावतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “तुमच्यावर जो राजा राज्य करील तो अशी सत्ता चालवील की तो तुमच्या पुत्रांना धरून आपले रथ व घोडे ह्यांची चाकरी करायला ठेवील, आणि ते त्याच्या रथांपुढे धावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमुवेल म्हणाला, “जो राजा तुमच्यावर राज्य करेल तो या गोष्टी तुमच्याकडून हक्काने मागेल: तो तुमचे पुत्र घेईल आणि त्यांना त्याचे रथ आणि घोडे यांच्याबरोबर सेवा करावयास लावील आणि ते त्याच्या रथांच्या पुढे धावतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांना म्हणाला, “जो राजा तुम्हावर राज्य करील त्याची रीत अशी होईल; तो तुमचे पुत्र घेऊन आपल्या रथांसाठी व आपले घोडेस्वार होण्यासाठी ठेवील आणि त्याच्या रथांपुढे ते धावतील.