1 Samuel 9:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढे गेल्यावर तुम्हाला तो दिसेल. घाई केलीत तर भोजनासाठी तो भक्ती स्थळापाशी पोचायच्या अगादेर तुम्ही त्याला भेटू शकाल. तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तिथे पोहोंचे पर्यंत लोक जेवायला सुरुवात करत नाहीत. म्हणून लौकर जा.” पूर्वी कोणी असे परमेश्वराला प्रश्न विचारायला निघाले, “चला, संदेष्ट्याकडे जाऊ” असे म्हणत असत. कारण तेव्हा परमेश्वराच्या माणसाला संदेष्टा म्हणत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुम्ही नगरात जाताच तो त्या उच्च स्थानी भोजनास जाण्याच्या अगोदर तुम्हांला भेटेल; तो यज्ञाला आशीर्वाद देतो म्हणून तो तेथे येण्यापूर्वी लोक जेवत नसतात; नंतर आमंत्रित लोक भोजन करतात. तर आता तुम्ही वर चढून जा, आताच त्याची भेट होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही शहरामध्ये प्रवेश करताच उंच टेकड्यावर भोजन करण्यास जाण्याआधी तो तुम्हाला सापडेल. तो येईपर्यंत लोक भोजन करीत नाहीत, कारण त्याने यज्ञाला आशीर्वाद दिल्यानंतरच, ज्यांना आमंत्रित केले आहे ते भोजन करतील. आता वर जा; आताच तो तुम्हाला सापडेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही तो जेवायला उंचस्थानी चढून जाण्याच्या आधी, नगरात जातानाच तुमची आणि त्याची भेट होईल. तो येण्याच्या अगोदर लोक जेवणार नाहीत, कारण तो यज्ञाला आशीर्वाद देतो मग बोलावलेले जेवतात. तर आता तुम्ही वर जा, कारण या वेळेस त्याची भेट होईल.”