1 Samuel 9:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमुवेलने मग त्यांना आणि त्याच्या नोकराला भोजनाच्या ठिकाणी नेले. तेथे तीस एक लोकांना भोजनासाठी आणि यज्ञात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. शमुवेलने या दोघांना पंगतीतल्या मानाच्या ठिकाणी बसवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमुवेलाने शौलाला व त्याच्या गड्याला भोजनगृहात नेले; आणि तेथे सुमारे तीस जण आमंत्रित होते, त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुखस्थानी त्यांना बसवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शमुवेलने शौल आणि त्याच्या सेवकास भोजनगृहात आणले आणि जिथे आमंत्रित केलेले सुमारे तीस लोक होते तिथे प्रमुखस्थानी त्यांना बसविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते.