1 Samuel 9:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल त्याप्रमाणे आपल्या वडीलांच्या गाढवांच्या शोधार्थ निघाला. एफ्राईमचा डोंगराळ प्रदेश, शलीशाच्या भोवतालचा प्रांत पालथा घातला तरी त्याला आणि त्याच्या नोकराला गाढवे सापडेनात. तेव्हा ते शालीम प्रांतात गेले. पण तिथेही शोध लागला नाही. म्हणून पुढे ते बन्यामीन प्रदेशातून हिंडले. पण गाढवे मिळाली नाहीतच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने एफ्राइमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायांखाली घातला तरी ती त्याला सापडली नाहीत; मग ते शालीम प्रांतात गेले तेथेही ती नव्हती; नंतर ते बन्यामिन्यांच्या प्रांतात गेले तेथेही त्यांचा पत्ता लागला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा तो एफ्राईमच्या संपूर्ण डोंगराळ प्रदेशात आणि शलीशाह भागाच्या सभोवती फिरला, परंतु त्यांना ते सापडले नाहीत. ते तसेच पुढे शालीम प्रांतात गेले, परंतु गाढवे तिथेही नव्हती. नंतर तो बिन्यामीनच्या हद्दीतून फिरला परंतु त्यांना ते सापडले नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातून जाऊन शलीशा प्रांतातून गेला, परंतु ती सापडली नाहीत. मग ते शालीम प्रातांतून गेले, परंतु येथे ती त्यांना सापडली नाहीत. नंतर ते बन्यामीन्यांच्या प्रांतातून गेले परंतु त्यांना ती सापडली नाहीत.