1 Samuel 9:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण नोकर म्हणाला, “या गावात एक परमेश्वराचा माणूस संदेष्टा आहे. लोक त्याला मानतात. तो बोललेले खरे ठरते. तेव्हा आपण या गावात जाऊ. कदाचित् तो आपल्याला पुढचा मार्ग दाखवील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, ह्या नगरात देवाचा एक माणूस राहत आहे, त्याची लोकांत मोठी मानमान्यता आहे; तो जे काही सांगतो ते सर्व घडून येते; चल, आपण तिकडे जाऊ; आपण कोणत्या मार्गाने जावे हे तो आपल्याला कदाचित सांगेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु सेवक म्हणाला, “पाहा, या शहरात परमेश्वराचा एक मनुष्य आहे; तो फार सन्माननीय आहे आणि जे काही तो सांगतो ते खरे होते. तर चल, आपण तिकडे जाऊ. कदाचित आपण कोणत्या मार्गाने जावे ते तो आपल्याला सांगेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा तो चाकर त्यास म्हणाला, “आता पाहा या नगरात देवाचा पुरुष आहे. तो पुरुष खूपच सन्मान्य आहे; जे तो सांगतो ते सर्व पूर्ण होतेच. तर आता आपण तेथे जाऊ; म्हणजे आपण कोणत्या मार्गाने पुढे जावे हे कदाचित तो आपल्याला सांगेल.”