1 Samuel 9:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल म्हणाला, “तर मग आपण जाऊच या पण त्याला द्यायचे काय? त्याला देण्यासारखे तर आपल्याजवळ काहीच नाही. आपल्याजवळचे फराळचे सुध्दा संपले. मग त्याला काय देणार?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा शौल आपल्या गड्याला म्हणाला, “हे पाहा, त्याच्याकडे जायचे तर त्याच्यासाठी काय घेऊन जावे? आपल्या थैलीतल्या भाकरी संपल्या आहेत; त्या देवाच्या माणसासाठी न्यायला आपल्याजवळ काही भेट नाही; आपल्याजवळ काय आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल त्याच्या सेवकाला म्हणाला, “जर आपण जात आहोत, तर आपण त्याला काय द्यावे? आपल्या पिशवीतील खाद्य तर संपले आहे. परमेश्वराच्या मनुष्याला देण्यासाठी आपल्याकडे काही बक्षीस नाही. आपल्याकडे काय आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शौल आपल्या चाकराला म्हणाला, “पण पाहा आपण जर जाऊ तर त्या मनुष्यास आपण काय घेऊन जावे? कारण आपल्या झोळीतल्या भाकरी संपल्या आहेत आणि परमेश्वराच्या मनुष्यास भेट देण्यासाठी काही राहिले नाही. आपल्याजवळ काय आहे?”