1 Thessalonians 1:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कारण आमची सुवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दांनी आली नाही तर पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने आली हे तुम्हांला माहीत आहे, आम्ही तुमच्यामध्ये कसे राहिलो तुम्हांला माहीत आहे. ते तुमच्या फायद्यासाठी होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आमचे शुभवर्तमान केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खातरीने तुम्हांला कळविण्यात आले. तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो, हे तुम्हांला ठाऊक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण निर्धाराने तुम्हांला कळवण्यात आली; तसेच तुमच्याकरता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हांला ठाऊक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हास कळविण्यात आली तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे.