1 Thessalonians 2:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यहुदी लोकांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही ठार मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालविले. ते देवाला जे प्रिय आहे, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधक झाले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारले आणि आमचा छळ करून आम्हांला बाहेर घालवले; देवाला जे प्रिय ते, ते करत नाहीत व ते सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;