1 Thessalonians 2:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बंधूंनो, आमच्यासाठी, आम्ही तुमच्यापासून थोड्या वेळासाठी वेगळे झालो होतो. आम्ही शरीराने वेगळे झालो होतो, विचाराने नाही आणि आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी फार अधीर झालो होतो. आणि तुम्हांला भेटण्याची फार इच्छा होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुजनहो, आम्ही मनाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला दुःख होऊन तुम्हांला प्रत्यक्ष भेटण्याचा आम्ही फार उत्कंठेने प्रयत्न केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंधुजनहो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुमच्यापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हांला विरहदुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंधूनो, आम्ही हृदयाने नव्हे तर देहाने तुम्हापासून थोडा वेळ वेगळे झाल्याने आम्हास विरह दुःख होऊन तुमचे तोंड पाहण्याचा आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला;