1 Thessalonians 3:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यासाठी की, जेव्हा आमचा प्रभु येशू त्याच्या पवित्र जनांसह येतो तेव्हा तो अशा प्रकारे तुमची अंत:करणे बळकट करो आणि त्यांना पवित्रतेने निर्दोष करो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.