1 Thessalonians 3:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि आम्ही तीमथ्याला पाठविले, जो आमचा भाऊ आणि देवाच्या कामाकरीता ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा करण्याकरीता सहकाही असा आहे, आम्ही त्याला तुम्हाला दृढ करण्यासाठी आणि तुमच्याविषयीच्या विश्वासात तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी पाठविले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक, ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे, आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आम्ही आपला बंधू तीमथ्य, ख्रिस्ताच्या सुवार्तेत देवाचा सेवक ह्याला ह्यासाठी पाठवले की, त्याने तुम्हास स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वाढीविषयी उपदेश करावा;