1 Thessalonians 3:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून मी अधिक काळ वाट पाहू शकत नसल्याने तुमच्या विश्वासाविषयी माहिती करुन घेण्याविषयी तीमथ्याला पाठविले. कारण मोहात टाकणाऱ्याने तुम्हाला मोहात टाकले असेल आणि आमचे श्रम व्यर्थ गेले असतील अशी मला भीति वाटत होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याचे पाठवले; कोण जाणे, कदाचित परीक्षकाने तुम्हास मोह घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.